पाच तुरुंगांत जेल टुरिझम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाशिक, ठाणे, धुळे, येरवडा आणि रत्नागिरी तुरुंगात जेल टुरिझम हा उपक्रम राबवला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आदीनी स्वातंत्र काळात तुरुंगवास भोगला होता. त्याची माहिती आता शाळकरी विद्यार्थी, संशोधन करणारे आणि इतिहासकाराना मिळणार आहे. जेल टुरिझमचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.

तुरुंग विभागाच्या अंतगर्त राज्यात 54 जेल आहेत. गंभीर ते किरकोळ गुह्यात शिक्षाधीन असलेले कैदी कसे आयुष्य जगतात याची अनेकांना उत्सुकता असते. पण सर्वसामान्यांना तुरुंगातील कैद्यांचे वास्तवादी आयुष्य पाहता येत नाही. तेलंगणामध्ये जेल टुरिझम नावाची संकल्पना सुरु करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता राज्यात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तुरुंगात आता जेल टुरिझम सुरु करण्यात येणार आहे. राज्यात जेल टुरिझम सुरु करण्याबाबत तुरुंग विभागाने गृह विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. जेल टुरिझमसाठी तुरुंग विभागाने ठाणे, येरवडा, धुळे, रत्नागिरी, नाशिक जेलची निवड करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या पाच कारागृहांत जेल टुरिझमची संकल्पना राबवली जाणार आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर हा उपक्रम सुरू केला जाईल. – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन