
पोलीस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱयांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अवघ्या चारच तासांत निवड व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याची कामगिरी फत्ते केली. इतक्या जलदगतीने यादी जाहीर करून आयोगाने उमेदवारांना प्रतीक्षा करण्याची झंजटच होऊ दिली नाही.
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या 250 पदांवर पदोन्नती देण्याकरिता विभागीय स्पर्धा परीक्षेतील 1031 उमेदवारांची शारीरिक चाचणी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे पेंद्रावर घेण्यात आली. दररोज सुमारे 250 उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण केल्यानंतर आज लगेचच प्रस्तुत परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 250 पदांवरील नियुक्तीसाठी पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे एकूण 1031 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.


























































