बेस्ट ऑफ लक! आजपासून दहावीची परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्या शुक्रवार, 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 26 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 5 हजार 86 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 59 हजार 478 मुले, तर 7 लाख 49 हजार 911 मुली आहेत.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून 56 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील सर्वाधिक नोंदणी ही मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून झाली आहे. छत्रपती संभाजीनगर 10, अमरावती 9, पुणे 7, नागपूर 7, नाशिक 6, कोल्हापूर 2, लातूर 1, कोकण 0 अशी नोंदणी झाली आहे. दहावीच्या परीक्षेला बसणाऱया ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. येत्या काही काळात यात आणखी भर पडेल, अशी अपेक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा…

शिक्षण मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.
परीक्षेसाठी सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता, दुपार सत्रात 2.30 वाजता परीक्षा दालनात हजर रहावे.
सकाळ सत्रात 11 वाजता आणि दुपार सत्रात 3 वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येईल.
पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटची दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

हेल्पलाइन

– 022-27881075
– 022-27893756
– 9869489606
– 8779062029