राज्यात तापमान वाढणार…अन् पावसाच्या सरीही कोसळणार; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात सध्या विचित्र हवामान दिसत आहे. यंदा वातावरणाचा लहरीपणा वाढल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात तापमान वाढत आहे. तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटकाही बसला आहे. या आठवड्यात काही जिल्ह्यात तापमान वाढून 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीही कोसळण्याची शक्यता आहे.

राज्यात वेस्टर्न डिस्टबन्समुळे हवामानात बदल होत आहे. हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण वाढत आहे. राज्यात 5 एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात या आठवड्यात सुमारे 3 अशांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात आद्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. तसेच या बदलत्या हवामानामुळे शनिवार ते सोमवारदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यासह देशातही सरासरी तापमानात वाढ होत आहे. हिमालय, उत्तराखंड आणि ईशान्य हिंदुस्थान वगळता देशात सरासरी 38 ते 40 अशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे. मध्य हिंदुस्थान, राजस्था, पंजाब आणि नवी दिल्लीत या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.