
सामना ऑनलाईन । मुंबई
कुर्ला पश्चिम भागात एका दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत अद्याप कुठलीही जिवीतहानी झाली नसून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.





























































