
मध्य प्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकांसाठी आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देताना चांगलाच टोला लगावला. काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर तुमच्याकडे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाईल का, तुम्ही राहुल गांधी यांना मागे टाकून स्वतःला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दावा कराल का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी घाई चांगली नाही. ही निवडणूक होऊ द्या. बकरी ईद में बचेंगे तो मुहरम में नाचेंगे असा टोला लगावला.




























































