धावत्या लोकलमध्ये मुलीचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकलमध्ये गर्दी असल्याचा गैरफायदा घेत शेजारी बसलेल्या अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला हात लावून तिचा विनयभंग करणाऱया तरुणाला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. विराज पांडे (28) असे त्या लिंगपिसाटाचे नाव आहे. मीरा रोड येथे राहणारे सुरेश (नाव बदललेले) हे सोमवारी 12 वर्षांच्या भाचीला घेऊन चर्चगेटच्या दिशेने येत होते. लोकलमधील प्रचंड गर्दीत त्या युवकाचे विचित्र चाळे सुरू होते. या कृत्याचा मुलीचा मामा सुरेश यांनी जाब विचारला असता विराजने त्यांना धक्काबुक्की करत पळण्याचा प्रयत्न केला, पण प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.