रॅप ऐकत होता म्हणून माथेफिरूने केली अल्पवयीन मुलाची हत्या

97

सामना ऑनलाईन । अॅरीझोना

सध्याच्या तरुणाईमध्ये रॅपचे फॅड आहे. परंतू अमेरिकेत रॅप गाणे ऐकण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाचा खून झाला आहे. अमेरिकेच्या अॅरीझोनामध्ये एका 17 वर्षीय मुलगा रॅप ऐकत असल्याने माथेफिरू तरुणाने त्याची हत्या केली आहे.

दोषी आरोपीचे नाव मायकल अॅडम्स असून या घटनेच्या दोन दिवस नुकताच तुरुंगातुन सुटला होता. मायकलला रॅप ऐकून असुरक्षित वाटले म्हणून त्याने तरुणाला पकडून त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. मृत तरुणाचे नाव एलीया अल-अमीन आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन गुरुवारी नुकतंच आपले काम संपवून एका दुकानाजवळ थांबला होता. एक दीडच्या सुमारास घरी जात असताना एका दुकानाच्या बाहेर रॅप गाणं ऐकत उभा होता. हे गाणं ऐकून आरोपी अॅडम्समने काही कळायच्या आतच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. तरुणावर वार होताच तो जागच्या-जागी रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. अवघ्या 20 मिनीटात एलिया गतप्राण झाला.

पोलिसांनी माथेफिरू आरोपी मायकलला तत्काळ अटक केली. अमेरिकेच्या कृष्णवर्णीय लोकांनी आपल्यावर आधी हल्ला केला होता. जेव्हा मी रॅप ऐकला तेव्हा मला असुरक्षित वाटल्याचे आरोपीने सांगितले. कारण जेव्हा कृष्णवर्णीयांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा ते लोकही रॅप ऐकत होते असे त्याने नमूद केले. रॅप ऐकल्यानंतर आपण बिथरलो आणि त्यातच त्या मुलाचा खुन केल्याची आरोपीने कबुली दिली. तसेच जे लोक रॅप ऐकतात ते माझ्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या