
आंदोलनादरम्यान जर माझा जीव गेल्यावर हे सरकार महाराष्ट्रात राहील का? मंत्री, आमदार हे त्यांच्या घरी राहतील का, दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना सरकारने सगेसोयर्यांचा अध्यादेश काढला तर त्याची अंमलबजावणी करणे ही सरकारच जबाबदारी आहे. कॅबिनेट बैठकीला हे सरकार चलढकल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये दंग आहे, समजायला तयार नाही. अजित पवार हे छगन भुजबळांना बळ देत आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाटकं सुरु केले. लगेच अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाज सोपा नाही, गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे म्हणतात. गुन्हे मागे घेण्यासाठी ही प्रक्रिया 50 वर्ष चालणार आहे का, असा सवालही जरांगे पाटलांनी केला.
अधिवेशनात सगेसोयर्यांची अंमलबजावणी केली नाही आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण नाही दिले तर महाराष्ट्रात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार कसे सभा घेतात, हे मराठा समाज बघेल, येथून पुढे आरक्षण नाही. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या, अशी मागणी असताना शिंदे समितीला फक्त दोन महिने मुदतवाढ देऊन सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे. 15 फेब्रुवारीचे अधिवेशन 20 फेब्रुवारीला नेऊन घातले. तुमच्या सारखे महानालायक कधीच पाहिले नाही. आंदोलन सुरू असताना निर्णय प्रक्रिया लवकर घेतात, तुम्ही पुढे नेऊन घालतात, स्वतःला राज्यकर्ते समजतात, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. निर्णय कधी घ्या, परंतु निर्णय होईस्तर मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहे.
दोन दिवसांपासून वयोवृद्ध, लहान लेकरे, महिला पाणी घेण्यासाठी अश्रू गाळत असताना यावर जरांगे पाटील म्हणाले, याअगोदर पाच महिने समाजाच्या कधीही समाजाच्या शब्दांचा पुढे गेलो नाही, या पुढेही जाणार नाही. सध्या समाजाचे वाटोळे व्हायला लागल्याने यावेळी ऐकणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नसल्याचे सांगितले.
शरीरात पाणी नसेल तर अवयांवर परिणाम होईल
आज आरोग्य विभाग जरांगे पाटील यांच्या तपासणासाठी आले असता आजही चेकअप करु दिले नाही. तपासणीस आलेले आरोग्य अधिकारी म्हणाले की, जरांगे यांच्या शरीरात पाण्याची नितांत गरज आहे, सलाईनद्वारे किंवा वरुन पाणी दिले पाहिजे, पाणी घेतले नाही तर शरीरातील इतर अवयांवर परिणाम होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.


























































