जरांगेंची पुन्हा गर्जना, ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवे आणि आम्ही ते मिळवणारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर केला होता. आताही जो निर्णय होईल त्याचा सन्मान केला जाईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते टिकाऊ नसेल. त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच, असा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी आज केला.

सगळेच कुणबी झाले तर महाराष्ट्रात एकही मराठा उरणार नाही! भुजबळांनी पुन्हा काडी टाकली

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बोलणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळी दिलेला निकाल आम्ही मान्य केला होता. आताही जो निर्णय येईल त्याचा आम्ही आदरच करू असे ते म्हणाले.

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. त्यामुळे आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहोत. मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी राज्यभरात सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला सरसकट कुणबी आरक्षण हवे आहे या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले.

Maratha Reservation – क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणी पूर्ण, निकालाची प्रतीक्षा