फरफट थांबविण्यासाठी मराठा आरक्षण योग्यच! याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज असेपर्यंत स्वराज्यात सर्व काही आलबेल होते. मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती चांगली होती. मात्र त्यांच्यानंतर मराठा समाजाची फरफट सुरू झाली. आजही ही फरफट कायम असून ही स्थिती बदलण्यासाठी मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण योग्य आहे, असा दावा आज याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला.