1 / 8
अभिनयाचा हुकमी एक्का, विनोदाचा बादशाह, गीतकार, लेखक, अभिनेता, चित्रपट-निर्माता अशा सर्वच क्षेत्रात दादा कोंडके यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.
कृष्णा ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत झाला. 14 मार्च 1998 रोजी दादरच्या रमा निवास या त्यांच्या बंगल्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तर विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले.
सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे चित्रपट अफाट गाजलेल होते. दादा कोंडकेंच्या लागोपाठ 9 मराठी चित्रपट त्या काळात सिनेमा गृहांमध्ये 25 आठवड्यापेक्षा जास्त चालले. त्यांची गिनीज बुकात नोंद आहे.
दादांची निर्मिती असलेला पहिला सिनेमा सोंगाड्या 1971 मध्ये आला. नाम्या नावक युवकाचे पात्र जो कलावतीच्या प्रेमात अखंड बुडाला. सोंगाड्या भयंकर हिट झाला तेव्हापासून भोळा नायक ही मुख्य शैली दादांनी सुरू ठेवली. दादांनी मराठी सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांचे अगदी चांगले संबंध होते. दादा हे शिवसेनेचे खंदे समर्थक होते. शिवसेनेच्या सभेत दादांची स्टेजवरील भाषणे गाजली.



























































