
वर्धा येथे सुरू असलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यावर विदर्भवाद्यांनी व्यासपीठाच्या दिशेने पत्रके भिरकावत वेगळ्या विदर्भाची घोषणाबाजी केली. त्यामुळं सभामंडपात मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना फरफटत बाहेर नेले.
96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी उद्घाटन कार्यक्रमात भाषण सुरू केले. तेव्हा एका महिलेने वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच व्यासपीठाच्या दिशेने पत्रके भिरकावली. मात्र, यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी सभामंडपाकडे येणारे सर्व मार्ग बंद केले. या महिलेलाही मांडवाबाहेर नेले.