‘काठी न् घोंगडं’ घेऊन धनगर बांधवांचा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आज धनगर बांधवांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी पारंपरिक वेषामध्ये धनगर बांधव मोर्चात सहभागी झाले होते.

धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न केवळ न्यायालयीन प्रक्रियेपुरता मर्यादित न ठेवता सरकारने आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून त्यावर मार्ग काढावा, कोणत्याही मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशी भूमिका यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी मांडली. सरकारने न्यायालयीन मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयात धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

चर्चगेट स्थानकाला अहिल्यादेवींचे नाव द्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी चर्चगेट स्थानकाला अहिल्यादेवींचे नाव द्यावे. मुंबईत अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारावे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील धनगर समाजाच्या योगदानाला योग्य सन्मान मिळावा, यासाठी वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने पायाभूत सुविधेला नाव देण्याची मागणी करण्यात आली.