
गुजरातच्या गांधीनगरमधील कुडासनजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अंदाजे 15 जण अडकले. अपघाताची माहिती मिळताच, गांधीनगर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या चार जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला, असे टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.


























































