
सामना प्रतिनिधी । मुंबई
मासूम या सामाजिक संस्थेचा आंतररात्र शालेय क्रीडा महोत्सव दणक्यात पार पडला. मुंबईतील 65 शाळांतील विद्यार्थ्यांनी यात हिरीरीने सहभाग घेतला. मुलांसाठी धावणे व कबड्डी तर मुलींसाठी डॉजबॉल व धावणे या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कबड्डी या खेळात आगरकर रात्र विद्यालयाने जेतेपदावर मोहोर उमटवली, तर मुलींच्या डॉजबॉल या सांघिक क्रीडा स्पर्धेत श्रीकृष्ण हिंदी नाईट स्कूलने अजिंक्य पदाला गवसणी घातली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ‘मासूम’च्या संस्थापिका/संचालिका निकिता केतकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक सुषम सावंत व आरती बारी (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व पंच) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी विजेत्यांना चषक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.




























































