जिंकलंस भावा आता चालव ‘जावा’, मयूर शेळकेला भेट म्हणून मिळाली नवीकोरी बाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळणाऱ्या मयूर शेळकेची दृश्ये संपूर्ण राज्याने पाहिली.

मयूरच्या या धाडसाचे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: फोनवरून कौतुक केले होते.

मयूरच्या या धाडसाचे बाईक उत्पादन करणारी कंपनी ‘जावा’नेही कौतुक करायचे ठरवले होते. या कंपनीने मयूरला नवीकोरी बाईक भेट म्हणून दिली आहे.

तुमचं कौतुक करायला शब्दच नाहीत!

मयूर ,तुम्ही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या मुलाचे प्राण वाचवलेत.तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.कल्पनेच्या पलीकडच काम केलय तुम्ही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहाद्दर मयूर शेळके याची पाठ थोपटली . वांगणी रेल्वे स्टेशनवर अंध आईसोबत जाताना रूळावर कोसळलेल्या चिमुकल्याचे प्राण तिथे ड्युटीवर असलेले पॉइंटमन मयूर शेळके यांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता वाचवले.त्यानंतर मयूरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मयूरच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याला आवर्जून फोन केला.ते म्हणाले, ‘मी तुमचा थरारक व्हिडीओ पाहिला .त्या चिमुकल्याचे प्राण वाचवलेत.त्या आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील तुम्हाला.पण तुमचीही काळजी घ्या.’असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मयूर शेळके हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तलवडे गावचा रहिवाशी आहे. कर्जत तालुक्याचा शान असलेल्या मयूरचा कर्जत –खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सत्कार केला.

साहेब,तुमचाही अभिमान वाटतो

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवर्जून फोन केल्याचा मोठा आनंद मयूर शेळके यांना झाला आहे.साहेब,तुम्ही वेळात वेऴ काढून मला फोन,माझे कौतुक केले पण कोविडच्या या संकटात तुम्ही जनतेसाठी झोकून देऊन झगडताय.तुमच्या या कार्याचाही आम्हाला मोठा अभिमान वाटतो.त्यातून आमच्यासारख्यांना प्रेरणा मिळते,अशी कृतज्ञता मयूरने मुख्यमंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले 50 हजारांचे पारितोषिक

मयूरच्या या कार्याची दखल घेऊन त्याच्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात गौरव करण्यात आला,तसेच आज रेल्वे मंत्रालयाने त्याला 50 हजार रूपयांचे पारितोषिकही जाहीर केले.परंतु मयूरनेही मनाची श्रीमंती दाखवली आणि त्यातील 25 हजार रूपये त्या अंध महिलेच्या वाचलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी दिले.