मेधा पाटकरांचा पासपोर्ट जप्त, गुन्ह्यांची  माहिती लपवली

657

मध्य प्रदेशात तब्बल 9 गुन्ह्यांची  नोंद असतानाही ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मार्च 2017 साली पासपोर्ट नूतनीकरण करताना ही माहिती लपवली. हे कारण देत मुंबईच्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाने त्यांचा पासपोर्ट जप्त केला.

मेधा पाटकर यांना 18 ऑक्टोबर रोजी विभागीय पासपोर्ट कार्यालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यावेळी कोर्ट आणि पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे मिळवावी लागणार असल्याने नोव्हेंबरमध्ये आपल्याला मुदत वाढवून मिळावी अशी विनंती पाटकर यांनी केली होती. मात्र आठवडाभरापूर्वीच त्यांची ही विनंती पासपोर्ट कार्यालयाने फेटाळून लावली आणि एका आठवड्यात आपला पासपोर्ट कार्यालयाकडे जमा करण्यास सांगितले.

जून महिन्यातच तक्रार

मेधा पाटकर यांच्यावर 1996 ते 2017 या कालावधीत मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवले गेले होते. जून महिन्यात एका पत्रकाराने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध पासपोर्ट कार्यालयात तक्रार दाखल केली होती. पाटकर यांनी माहिती लपवून पासपोर्ट नूतनीकरण केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या