
सामान्यांना परवडणाऱया किमतीत घरे देण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. त्यानुसार दरवर्षी किमान चार ते पाच हजार घरांसाठी लॉटरी काढली जाईल, अशी ग्वाही म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांनी दिली. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने ठाणे शहर, पालघर आणि रायगड जिह्यातील तब्बल 5 हजार 311 घरांची संगणकीय सोडत शनिवारी ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 5311 सदनिकांपैकी 2278 सदनिका प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत असल्याने 3033 सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे अधिकारी-कर्मचारी, सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































