चकाकत्या क्षितिजावर ताऱयांचे अगणित ठिपके, नासाने टिपलं ‘मिल्की वे’चे विलोभनीय दृश्य

पृथ्वीचं लकाकतं क्षितिज आणि त्यावर हजारो ताऱयांची रांगोळी…. ‘मिल्की वे’ चं असं नितांतसुंदर रुपडं नासाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. हा फोटो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून काढण्यात आला आहे. ‘मिल्की वे’चे विलोभनीय दृश्य शेअर करताना नासाने म्हटलंय, आम्ही खूप अचंबित झालो आहोत.

आमच्या या फोटोला कोणत्याही वर्णनाची गरज नाही. कित्येक तास आम्ही हे दृश्य बघू शकतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे सोएची नोगुची यांनी हा फोटो टिपला आहे. ‘मिल्की वे’ फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

दुधाळ प्रवाह…

अंतराळात तारे, वायू आणि धूळ यांचा एक मोठा समूह गुरुत्वाकर्षणामुळे बांधला गेला आहे त्याला आकाशगंगा असे म्हणतात. आकाशात चमकणारे सर्व तारे आपल्या आकाशगंगेचा भाग आहेत. सूर्य आणि त्याच्या सर्व ग्रहांना आकाशगंगेचा हिस्सा मानलं जातं. त्याला ‘मिल्की वे’ असं म्हणतात. दाट अंधाऱया रात्री आकाशाकडे निरखून बघितले की असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा पट्टा दिसतो. त्यामुळेच आपल्या आकाशगंगेला मिल्की वे असं म्हटलं जातं.

आपली प्रतिक्रिया द्या