सुशेगाद गोव्यात खाणीवर अवलंबून असलेल्यांची निदर्शने, मोर्चाला चांगला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

खाणीवर ज्यांची कुटुंब अवलंबून आहेत अशी गोवेकर मंडळी आता  आक्रमक बनत चालली आहे. शुक्रवारी सकाळी खाण अवलंबितांनी  पणजीत मोर्चा काढला. हा मोर्चा गोव्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांना इशारा देण्यासाठी काढण्यात आला आहे. आझाद मैदानावर एकत्र जमलेले खाण अवलंबित मोर्चा घेऊन काँग्रेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यासाठी निघाले आहेत. त्यानंतर हे आंदोलन गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन गोवा फोरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना निवेदन सादर करणार आहेत.1000 खाण अवलंबित या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यापासून विविध मंत्री, आमदार, खासदार यांच्या खाण अलंबितांनी भेटी घेतल्या होत्या. सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. सार्वजकिन बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, वीजमंत्री नीलेश काब्राल, सभापती प्रमोद सावंत, खासदार व केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, अन्य आमदार सर्वपक्षीय शिष्टमंडळानीही दिल्लीला जाऊन गोव्याची बाजू मांडली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र खाणबंदीवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे खाणीवर उपजिवीका असलेली मंडळींचा संयम संपला असून ते आक्रमक व्हायला लागले आहेत.