मुंबई, पुण्याच्या पाहुण्याला सक्तीने विलगीकरणात ठेवा; बाळासाहेब थोरात यांची सुचना

पारनेर तालुक्याचा मुंबई, पुण्याशी मोठा संपर्क असल्याने तेथून गावी आलेल्या पाहुण्याला सक्तीने विलगीकरणात ठेवा अशी सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी शनिवारी पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना थोरात यांनी तालुका प्रशासनाचे कौतुक केले. प्रशासनाने लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याचं ते म्हणाले. येत्या 30 तारखेपर्यंत अशीच शिस्त पाळली तर पारनेर तालुक्याचा आकडा सर्वात कमी असेल असे थोरात म्हणाले.

पारनेर शहरासह भाळवणी, टाकळीढोकेश्‍वर व जवळा येथील रूग्णांचा आकडा मोठा आहे. इथली रुग्णसंख्या जास्त का आहे ? अशी विचारणा थोरात यांनी केली. या भागातील रुग्णसंख्या वाढू नये यासाठी काळजी घेण्याची सूचनाही थोरात यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर केला जाईल असे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या