शाहूनगरमध्ये अल्पवयीन मित्राने केली मित्राची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहूनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या अल्पवयीन मित्राची हत्या केल्याची घटना घडली. त्रास देतो म्हणून संतापाच्या भरात धारदार चाकूने छातीवर वार करून हत्या करण्यात आली. शाहूनगर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

शाहूनगरच्या जस्मिन रोडवर आरोपी आणि मृत मुलगा एकमेकांच्या आजूबाजूला असलेल्या इमारतीत राहत होते. आरोपी समीर शेख (नाव बदललेले) हा बारावीचा विद्यार्थी असून मृत सोहेल (नाव बदललेले) हा दहावी पास होता. सोहेल हा गेल्या वर्षभरापासून त्याच्या म्हैसूर येथील काकाकडे राहत होता. ईद साजरी करण्यासाठी तो मुंबईत आला होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. बुधवारी रात्री समीर आणि सोहेल यांच्यात वाद झाला. तेव्हा त्यांच्या मित्रांनी समज काढून त्यांचा वाद मिटवला. मात्र समीर रागाच्या भरात घरी गेला आणि धारदार चाकू घेऊन आला. समोर सोहेल दिसताच समीरने त्याच्या छातीवर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या सोहेलला लगेच शीव रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लहानपणापासून खास मित्र असलेल्या सोहेल आणि समीरमध्ये क्षुल्लक कारणाने असल्याचे नकोसे करून टाकले.