
रस्त्याने पायी घरी चाललेल्या अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्याकडील पाच हजार रूपये किंमतीचा मोबाइल दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील महादेवनगर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा शुक्रवारी रात्री 8.30 सुमारास रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी पाठलाग करून त्याला अडविले. त्याच्या हातातील पाच हजारांचा मोबाइल हिसकावत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गांधले अधिक तपास करीत आहेत.






























































