शहरातील प्रभाग निहाय आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न

17

सामना प्रतिनिधी । जळगाव

पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची नेतृत्वाखाली शहरातील  प्रत्येक प्रभागात आढावा  घेण्यात येत आहे. आज प्रभाग क्रमांक ११ मध्ये रंगार गल्ली येथील श्री दत्त मंदिर येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रामुख्याने संघटनात्मक बांधणी व शहराचा विकास यासोबतच शिवसेना  सभासद नोंदणी, नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची  नियुक्त्या करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना शहर प्रमुख  किशोर बारावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आमदारांनी मागील चार वर्षात आमदारांनी पाचोरा शहरासाठी अंडरग्राउंड ग्रॅनाईट गटार, हिंदू स्मशानभूमी तातडीची पाणीपुरवठा योजना, शहरातील ओपन स्पेस येथे खुले सभागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, टाऊन हॉल, ई-वाचनालय अद्यावत भाजी मंडी अशा अनेक प्रकारच्या सुविधा आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहिल व यांच्या टीमने केले आहे.”

यावेळी प्रभातील नागरिकांनी आमदार पाटील यांच्या समोर प्रभागातील किरकोळ समस्या मांडल्या यावेळी आमदार यांनी सांगितले की, “मी  सात ते आठ दिवसापासून शहरातील विविध प्रभागात  आढावा बैठक घेऊन शिवसेना पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्याचे काम करत आहे. सोबतच  शहरातील नागरिकांनी नेहमीच शिवसेना सोबत आहे व पुढेही रहातील मला याची खात्री आहे. सर्व प्रथम शहरातील नागरिकांच्या  ज्याकाही अडचणी आहे त्या अडचणी नगरपालिका येथे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी याची  बैठक घेऊन एकदा सामुहीक चर्चा करून लवकरात लवकर  सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो”.

यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, आशिर्वाद इन्फ्राचे मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक गंगाराम पाटील, सतीश चेडे, बंडु चौधरी, किशोर बारावकर, भरत खंडेलवाल, बापु भावसार, प्रभागातील नागरिक,शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या