शहांना तडीपार संबोधणाऱ्या पवारांना धनंजय मुंडे कसे चालतात? धस यांचा सवाल

181

सामना प्रतिनिधी । बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका बसला आहे. मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाने सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी टीका केली आहे.

सुरेश धस यांनी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहांना तडीपार म्हणुन हिणवणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला व त्यांच्या नेत्यांना अनेक शेतकऱ्यांची जमिन लुबाडणारा, सरकारी जमिन हडपणारा, मयताची जमिन बळकावणारा, जिल्हा बॅंक देशोधडीला लावून जप्ती आलेला विरोधी पक्षनेता कसा काय चालतो? असा खणखणीत सवाल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या