मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पाठीवरील शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पाठीच्या स्नायूंमध्ये साकळलेल्या रक्तामुळे त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

टेनिस खेळताना त्यांच्या हाताचे स्नायू तसेच पाठीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. पाठीवरील शस्त्रक्रियेसाठी आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. जलील परकार आणि डॉ. विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या डिस्चार्जबाबत उद्या विचार करण्यात येणार असून दोन ते तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.