
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या घटली आहे. भारतीय दूरसंचार निगमने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. यात कुठलीच चिंताजनक गोष्ट नसल्याचे ट्रायकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत फोन कंपन्याकडून रिचार्ज प्लान मध्ये बदल करण्यात आले आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये घट झाल्याचे ट्रायचे संचालक आर.एस शर्मा यांनी सांगितले.
ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च पर्यंत मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 116 कोटी 18 लाख इतकी आहे. एप्रिलमध्ये ही संख्या 118 कोटी इतकी होती. म्हणजेच दोन कोटींनी मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत घट झाली आहे.
गेल्या काही दिवसांत नफ्यासाठी कंपन्यांनी नवे रिचार्ज प्लान आणले आहेत. त्यात वैधता रिचार्जचा समावेश आहेत. त्यानुसार तुम्ही एखादा रिचार्ज केला तर त्याच्या वैधतेसाठी दुसराही रिचार्ज करणे अनिवार्य आहे. या रिचार्जमुळे अनेक ग्राहकांमध्ये नाराजी आहे. कारण काही वर्षांपूर्वी अनेक टेलिकॉम कंपन्यांनी लाईफटाईमचा रिचार्ज करून वैधतेची सेवा दिली होती. आता अचानक हा वैधतेचा रिचार्ज सुरू केल्याने अनेकांनी नंबर पोर्टसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे अनेक क्रमाकांच्या सेवा बंद आहेत. त्यामुळेच ही घट झाल्याचे म्हटले जाते.
























































