लातूरमध्ये डॉक्टरचे महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णासोबत लातूरातील डॉक्टरने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉ.आनंद पवार याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विवाहित महिला पतीपासून विभक्त राहात आहे. धुणी भांडी करुन आपली उपजिवीका ती भागवते. जुन -जुलै महिन्यात मासिक पाळीचा व अधिक रक्तस्त्राव होण्याचा आजार झाल्याने ती डॉ. आनंद पवार यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेलेली होती. त्यावेळी दोन वेळा बॉडी मसाज करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. २० नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात गेल्यानंतर बॉडी चेकअपच्या नावाखाली डॉक्टरने तिच्याशी अश्लील वर्तन केले. आरडा ओरडा करत ती दवाखान्याच्या बाहेर पळत आली आणि थेट पोलीस ठाणे गाठले व डॉक्टरच्या कृत्याबद्दल तक्रार दाखल केली. डॉ.आनंद पवार यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.