मध्य रेल्वेचा खोळंबा, शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी रात्री रेल्वेच्या खाली येत आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक मोटरमनने  काम करण्यास नकार दिला. मोटरमन नसल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील 84 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र दुपार पासून हा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे 100हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.