
राज्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 40 हजार 061 रुग्ण बरे झाले असून दिवसभरात 11 हजार 549 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 22 हजार 543 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या 2 लाख 90 हजार 344 रुग्णांकर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 391 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.79 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 52 लाख 53 हजार 676 नमुन्यांपैकी 10 लाख 60 हजार 308 नमुने पॉझिटिव्ह (20.18 टक्के) आले आहेत. राज्यात 16 लाख 83 हजार 770 लोक होम क्कारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 294 लोक संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 2,085 कोरोना रुग्ण
मुंबईत रविवारी दिवसभरात 2,085 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 902 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 30,918 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 41 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 41 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 147 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 30 हजार 271 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 9 लाख 15 हजार 789 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 69,693 वर पोहोचली आहे.





























































