
आई-मुलीचे नातं फार खास असतं. मात्र एका आईने आपल्या मुलीसोबत असे काही केले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून इंटरनेटवर चर्चेत आहे. मुलीने हा आपल्यासोबत सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या व्हेनेसाने सांगितले की, ती सुट्टीत मेक्सिकोला गेली होती. त्यावेळी तिचा प्रियकर आणि तिची आई दोघेही तिच्या घरी होते. व्हेनेसाने सांगितले की, जेव्हा तिने मेक्सिकोहून तिच्या आईला फोन केला तेव्हा ती फोनवरच रडू लागली. मात्र काही दिवसांनी फोनवरच मुलीच्या आईने धक्कादायक खुलासा केला.
जेव्हा तिच्या आईने व्हेनिसाला ती गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा व्हेनेसाच्या आनंदाला पारा उरला नव्हता. ती प्रचंड खूश झाली होती. पण तिचा आनंद फारवकाळ टिकला नाही. आईने तिला धक्कादायक खुलासा केला. ती व्हेनेसाच्या प्रियकरापासून गरोदर होती. व्हेनेसाला मोठा धक्का बसला. ती काहीवेळासाठी हादरली आणि तिला आईचा संताप आला. तिने लगेचच तिच्या आईसह प्रियकराला ब्लॉक केले. यानंतर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या व्हेनेसाने पुन्हा देशात परतण्याचा निर्णय घेतला आणि ती आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली.
या मुलीची वेदनादायक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स प्रियकर आणि मुलीच्या आईवर संतापले आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर व्हेनेसाच्या प्रियकराने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती दोघांनाही माफ करु शकले नाही.





























































