108MP चा कॅमेरा 6000mAh ची बॅटरी, येत आहे Moto चा जबरदस्त स्मार्टफोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटोरोलाने नुकतेच हिंदुस्थानात Moto G10 Power आणि Moto G30 हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता कंपनी G सिरीजमध्ये आणखीन नवीन फोन आणण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच G सिरीजमधील Moto G60 स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

XDA Developers रिपोर्टनुसार, Hanoip कोडनेम असलेला Moto G60 हा स्मार्टफोन अमेरिका आणि युरोपमध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च होईल. हा फोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये कंपनी लॉन्च करू शकते. हिंदुस्थानातही हा फोन लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.

Moto G60 स्मार्टफोनमध्ये फुल एचडी + रेझोल्यूशनसह 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला स्पोर्ट करेल. ज्यामध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी पंच-होल कटआउट असेल. मागील बाजूस या फोनला 108-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर मिळेल. या व्यतिरिक्त 16-मेगापिक्सलचे वाईल्ड -एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. या फोनमध्ये कंपनी 6000mAh ची बॅटरी देखील देऊ शकते.