
मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीला आपल्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे समजले. त्याने आपल्या पत्नीला विचारले असता एका मजुराने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. परंतु ही गोष्ट तिने कुठेही सांगितली नव्हती. नंतर आरोपी मजूराने पुन्हा पीडितेला एकटे गाठले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तेव्हा पीडितेने जोरदार प्रत्युत्तर दिले. तेव्हा या आरोपीने या महिलेचे अश्लील फोटो व्हायरल केले. त्यामुळे पीडित महिलेने आत्महत्या केली.




























































