प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फोडला, प्रियकराने प्रेयसीसाठी हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केला खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी झालेल्या परिक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसाठी हा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी २२ मार्च 2022 रोजी परिक्षा पार पडली होती. मात्र आता या परिक्षेतला पेपर फुटल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आयोगाने ही परिक्षाच रद्द केली असून त्यासाठी फेरपरिक्षा घेण्यात येणार आहे.

दरम्यान हा पेपर एका तरुणाने त्याच्या प्रेयसीसाठी फोडल्याचे समोर आले आहे. या प्रियकराने एमपीएससीमधील एका कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे.