
-
अनेकदा कोफ्ते किंवा मंचुरियन बॉल्स बनवताना ते तेलात सुटतात/मोकळे होतात. अशा वेळी तुम्हाला जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या. भाजी किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका; त्याऐवजी त्यात मीठ घालून १५ मिनिटे ठेवा.
-
यानंतर भाज्यांना पाणी सुटेल. ते पाणी व्यवस्थित गाळून घ्या आणि त्यानंतरच कोफ्ते बनवा.
-
तेलात जिरे आणि तमालपत्र परतून घ्या. त्यात टोमॅटोची पेस्ट व सुके मसाले घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. मिश्रणाला उकळी आणा आणि गरमागरम सर्व्ह करा.





























































