प्रभादेवीत जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटल सेतूची वांद्रे वरळी सी-लिंकला जोडणी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत मार्गातील प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामात मंगळवारी प्रभादेवी येथे जलवाहिनीला धक्का लागून लाखो लिटर पाणी वाया गेले. सायंकाळी 4 च्या सुमारास जलवाहिनीला लागलेली मोठी गळती समोर येताच पालिकेच्या जल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गळतीवर नियंत्रण मिळवले.