
दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश देत एफएसएसएआयने एफएमसीजी कंपनी आयटीसीचा परवाना रद्द करणे किंवा त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश दिले. हा आदेश आयटीसीच्या लोकप्रिय ‘आशीर्वाद शुद्ध चक्कीचा आटा’वर ‘100 टक्के’ शब्दाचा वापर करण्यावरून देण्यात आला आहे. त्यामुळे आशीर्वाद आटा कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायाधीश स्वर्णा कांता शर्मा यांनी एफएसएसएआयला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पुढील सुनावणी होईपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये. एफएसएसएआयने 28 मे 2025 रोजी एक पत्रक जाही केले होते. यात म्हटले होते की, सर्व खाद्य कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या लेबल, पॅकेजिंग आणि प्रचार साहित्यावर 100 टक्के शब्दांचा वापर करू नये. या नोटिसीत म्हटले की, लेबल, जाहिरात आणि वेबसाईटवरून 100 टक्के शब्द हटवा. तसेच 15 दिवसांत कम्पलिएन्स रिपोर्ट सादर करा. या निर्णयाविरोधात आयटीसी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.






























































