ताम्हिणी घाटाच्या दरीत अज्ञात महिलेचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताम्हिणी घाटातील तब्बल २० फूट खोल दरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची ओळख पटली नसून तिचा अपघात झाला की घातपात करून तिची हत्या करण्यात आली याचा शोध माणगाव पोलीस घेत आहेत.
पुणे-कोकणाला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील एका वळणावरील खोल दरीत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी रेस्क्यू टीमची मदत घेऊन दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढला. या महिलेची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही महिला कोण आहे, तिचा मृत्यू कशामुळे झाला. या घटनेमागे घातपात आहे की अपघात हे तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली.