
‘अदानी’ इलेक्ट्रिसिटी’मधील कर्मचारी कपात रोखण्यासाठी आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या संरक्षणासाठी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर मंगळवारी जोरदार निदर्शने केली. कामगिरीच्या कारणाखाली कंपनीने 33 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरीची सुरक्षितता आणि मानसिक-आर्थिक स्थितीचा प्रश्न निर्माण झाला आहे.






























































