मुलायम सिंह यांनी भाजप-काँग्रेसला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. बुधवारी टीडीपी खासदाराकडून सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांनी मंजुरी दिली होती, त्यानंतर शुक्रवारी लोकसभेत यावर जोरदार धमासान सुरू आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे खासदार मुलायम सिंह यांनी भाजप सरकारवर तुफान हल्ला चढवला.

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना ‘जादूकी झप्पी’

यावेळी बोलताना मुलायम सिंह म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही तीन जागांवर विजय मिळवला. सत्तेमध्ये असतानाही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. धर्म आणि जातीच्या आधारावर देशातील वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे’, असा आरोपही त्यांनी केला. तसेच सरकारला खरंच काही करायचे असेल तर आम्हीही त्यावर आमचे मत व्यक्त करू’, असे ते म्हणाले.

मोदींचे चार वर्षात ८४ देशांचे दौरे आणि १,४८४ कोटींचा खर्च

आपल्या भाषणादरम्यान मुलायम सिंह यांनी शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने शेतकरी आणि तरुणांसाठी काही तरी करायला हवे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्यास त्यांना फायदा होईल असे ते म्हणाले. तसेच देशातील २ कोटी पदवीधर तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटायला हवा.

काँग्रेसलाही फटकारले
मुलायम सिंह म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. तसेत काँग्रेस सरकार सत्तेत असतानाही त्यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही परंतु त्यांनी काहीच केले नाही.