गोवर रुग्णांची संख्या 176 वर, नवव्या बाधिताचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवरबाधितांची संख्या वाढत असून आज एकाच दिवसात सात रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 176 वर पोहोचली आहेत. तर आज आणखी एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मुंबईतील गोवरबाधित मृतांची संख्या 9 झाली आहे.

मुंबईत गोवरबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गोवरमुळे लहान मुलांमधील प्रतिकारशक्ती कमी होणे, अतिसार, न्युमोनिया अशा गंभीर आजारांचे प्रमुख कारण असून यामुळे मुले विविध आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात सापडतात.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जानेवारीपासून गोवर प्रतिबंधक 13962 लसीचे डोस देण्यात आले आहे.

मुंबईची स्थिती

एकूण घरांचे सर्वेक्षण    2387386

ताप व पुरळाचे गोवर संशयित 2860

ऑक्सिजन उपचार असलेले रुग्ण 7

व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण        2

डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 46

आतापर्यंत झालेले लसीकरण