
मालाड येथील एका प्रसिद्ध बँकेत शिरून चोरटय़ाने चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी एका संशयिताला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. तक्रारदार एका बँकेत ब्रँच ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात. गेल्या आठवडय़ात रात्री एक संशयित बँकेत शिरला. त्याने लॉबीची लाईट सुरू करून पॅश एरियामध्ये प्रवेश केला. तसेच त्याने बँकेतील सीसीटीव्ही पॅमेरे काढले. सर्व्हर रूममधील वायरिंगसह लॉकर रूमच्या सेन्सरचे नुकसान केले. त्याचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यानंतर तो तेथून पळून गेला.






























































