अभिनंदन आणि शुभेच्छा! ‘मातोश्री’वर रीघ सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर ‘मातोश्री’ निवासस्थानी अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी रीघच लागली आहे.

uddhav-final-1

मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजप खासदार सुजय विखे-पाटील, प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासह उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री मतदारसंघाचे भाजप खासदार राजकुमार चाहर यांनी भेट घेतली.

uddahv-final-3

त्याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय जाधव, धैर्यशील माने यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.