मासे महागले, खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दरवर्षीपेक्षा यंदा डिसेंबर महिन्यात मुंबईत मासे प्रचंड महाग झाले आहेत. ख्रिसमसच्या सुट्ट्या, विकएन्ड आणि थर्टी फर्स्टमुळे पार्ट्यांचा माहोल निर्माण झाला आहे. त्यामुळे माशांना असलेली मागणी वाढली आहे. तर थंडीमुळे माशांची आवक काही प्रमाणात घटल्यामुळे माशांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. 600 रुपयांना अडीचशे ग्रॅम मिळणारे पापलेट तब्बल 900 रुपयांनी महाग झाल्यामुळे खवय्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मासे महागल्यामुळे हॉटेलवाल्यांनीही दर वाढवले असून सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मांसाहारी हॉटेल्समध्ये मासे खवय्यांची गर्दी असल्याचे चित्र आहे.

मासे दर
पापलेट (250 ग्रॅम) –  आधी  600 आता 900 रुपये
पापलेट (150 ग्रॅम) – आधी 400 आता 700 रुपये
सुरमई (किलो) – आधी 450 आता 800 रुपये
घोळ, वाम (किलो) – आधी 400 आता 750 रुपये
बांगडा (किलो) – 70 आता 200 रुपये