गतिमंद मुलीवर अल्पवयीन मुलांचा अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शौचालयास निघालेल्या 17 वर्षीय गतिमंद मुलीला तिघा अल्पवयीन मुलांनी शौचालयात जबरदस्ती नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर एकाने त्याचा व्हिडीओ बनवून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवडय़ात पीडित मुलगी शौचास गेली होती. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांनी तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने बाथरूममध्ये नेले. तेथे एकाने मुलीचे शारीरिक शोषण केले, तर दुसऱ्याने त्या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडीओ आरोपींनी इन्स्टाग्रामवरून व्हायरल केला. हा प्रकार मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना पकडले.