वाडिया रुग्णालयाला निधी देणार की नाही- हायकोर्टाची सरकारला विचारणा

निधीअभावी वाडिया रुग्णालय चालवणे प्रशासनाला अवघड जात असून हे रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पालिका प्रशासनाने या रुग्णालयासाठी 14 कोटी देऊ केले असले तरी अद्याप सरकारकडून आवश्यक तो निधी मिळालेला नाही. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी घेतली.

रुग्णालयाला निधी देणार की नाही असा सवाल सरकारला करत या प्रकरणावरील सुनावणी 16 जानेवारीपर्यंत तहकूब केली. रुग्णालये सुरळीत चालावीत म्हणून सरकारतर्फे या रुग्णालयांना निधी देण्यात यावा अशी मागणी करत ऍड. दीपेश सिसोदिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारच्या वतीने बाजू मांडताना ऍड. प्रियाभूषण काकडे यांनी कोर्टाला सांगितले की, हे रुग्णालय खासगी असल्याने यावर सरकारचा

कोणताही अंकुश नाही. त्यामुळे सरकारमार्फत मिळणारा 50 टक्के निधी थांबविण्यात आला होता. आता सरकार बदलले असून निधी देणार की नाही याबाबत निर्णय होणे बाकी आहे. त्यासाठी न्यायालयाने वेळ द्यावा अशी विनंती केली.

आपली प्रतिक्रिया द्या