
लोखंडी बॅरिकेड्स अंगावर पडल्याने अल्पवयीन मुलगी जखमी झाल्याची घटना मालाड येथे घडली. घडल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी जे. कुमार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा नोंद केला.
तक्रारदार या मालाड पूर्व येथे कुटुंबीयांसोबत राहतात. तिच्या बहिणींना शाळेला सुट्टी लागल्याने त्या मालाड पूर्व येथील टॉरमॅट कंपनीसमोरील रस्ता येथे रात्री चालण्यास जातात. तो रहदारीचा रस्ता अद्याप खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी हे रात्रीच्या वेळेस तेथे चालण्यास जातात. त्या रस्त्यावर जे. कुमार कंपनीचे 15 ते 20 लोखंडी बॅरिकेड्स कसेही उभे करून ठेवले आहेत. चार दिवसांपूर्वी तक्रारदार याची आई आणि तिच्या बहिणी, त्रिशा, समीक्षा, आराध्या या जेवल्यानंतर चालण्यासाठी गेल्या होत्या. रात्री एका मुलाने येऊन तक्रारदार यांना माहिती दिली. खेळत असताना त्रिशाच्या अंगावर लोखंडी बॅरिकेड्स पडले. तिला एका खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. बॅरिकेड्स पडल्याने तिच्या दोन्ही मांड्याना दुखापत झाली. घडल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सुपरवायझरविरोधात गुन्हा नोंद केला.



























































