पुजाराच्या करारावर निरंजन शहा निराश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱयावरील कसोटी क्रिकेट मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मात्र तरीही या कसोटीपटूला ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट प्रशासन समितीने (सीओए) ए प्लस कराराच्या क्षेणीत न ठेवल्याने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव निरंजन शहा यांनी नाराजी व्यक्त केली. पुजाराने चार सामन्यांच्या मालिकेत तीन कसोटी शतके झळकावली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला 2-1 फरकाने हरवून इतिहास रचला, मात्र तरीही पुजाराला अव्वल क्षेणी न मिळणे म्हणजे कसोटी क्रिकेटबाबतची ही उदासीनताच म्हणावी लागेल. पुजाराला ‘ए’ श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे, मात्र त्याला कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांच्या ‘ए’ प्लस श्रेणीत स्थान द्यायला हवे होते असेही निरंजन शहा यांनी सांगितले.