
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल व पुणे वाहिनीवर कि.मी. 45/800 खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 10-10-2023 रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते दुपारी 2 या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.





























































